Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

होय ! AI चा पहिला फोन येतोय लवकरच; कोणत्याही टचविना करता येतील ‘ही’ कामे

होय ! AI चा पहिला फोन येतोय लवकरच; कोणत्याही टचविना करता येतील ‘ही’ कामे

नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक स्मार्टफोन्स, गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्याचा वापरही वाढताना दिसत आहे. त्यातच आता AI अर्थात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’कडून नवा फोन आणला जात आहे. याचीच सध्या चर्चा सुरु झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) फक्त चॅटिंगपुरते मर्यादित नाही. टिकटॉकची मूळ कंपनी, बाईटडान्सने अलीकडेच ‘एआय फोन’चा एक प्रोटोटाईप लाँच केला आहे.

बाईटडान्सने त्याचा Doubao AI Agent (DOUBAOAI) विकसित केला आहे. याच्या माध्यमातून युजर्सच्या मोबाईल स्क्रीन पाहू आणि नियंत्रित करू शकतो. हा एजंट अॅप्स उघडू शकतो आणि युजर्ससाठी ऑर्डर देऊ शकतो. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जे काही करतो ते कोणत्याही स्पर्शाविना. हेच त्याचं सर्वात विशेष असे फीचर आहे. ‘एआय फोन’ कॉल, मेसेज आणि अगदी तिकीट बुकिंग करण्याची सुविधा देऊ शकते.

शेन्झेनमधील व्यापारी टेलर ओगनचा एआय फोन दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ते एआय फोनमध्ये व्हॉईस कमांड प्रविष्ट करतात, त्यानंतर स्मार्टफोन आपोआप काम पूर्ण करतो. या व्हिडिओमुळे अनेकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. रिपोर्टनुसार, बाईटडान्स लवकरच त्यांच्या एआय फोन्सची वैशिष्ट्ये कमी करेल, ज्यामुळे त्यांना संवेदनशील डेटा अॅक्सेस करता येणार नाही. मात्र, त्याच्या अधिकृत लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

सिरी हे अलेक्सासारख्या व्हॉईस असिस्टंटपेक्षा वेगळे

‘एआय फोन्स’ प्रत्यक्षात व्हॉईस असिस्टंटपेक्षा वेगळे आहेत. हे सिरी, अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटपेक्षा वेगळे आहे. व्हॉईस असिस्टंट व्हॉईस कमांडवर आधारित अॅप्स सक्रिय करतात, ज्यामुळे त्यांना निवडक फीचर्स अॅक्सेस करता येतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!