Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिवाळीत परफेक्ट फोटो हवेत? तर नॅनो बनाना ठरेल फायद्याचा, फोटो येतील क्लिअर

दिवाळीत परफेक्ट फोटो हवेत? तर नॅनो बनाना ठरेल फायद्याचा, फोटो येतील क्लिअर

नवी दिल्ली : सध्या फोटो एडिटिंगसाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला दिवाळीत चांगले फोटो हवे असतील तर गुगल जेमिनी एआय आणि नॅनो बनाना वापरू शकता. या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही तुमचे फोटो योग्यरित्या एडिट करू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरावे लागतील.

गुगल नॅनो बनाना एआय वापरून तुम्ही आकर्षक दिवाळी-थीम असलेले फोटो तयार करू शकता. तुम्ही प्रॉम्प्टमध्ये तुमच्या फोटोचा लूक, कपडे आणि एरिया क्लिअर करू शकता. यामुळे तुमचे फोटो एकदम रिअल दिसू शकतील. तुम्हाला तुमच्या फोटोंचे रिझोल्यूशन विचारात घ्यावे लागणार आहे. जर तुम्ही हायपर-रिअलिस्टिक 4K पोर्ट्रेट किंवा सिनेमॅटिक 8K एचडी इमेज सारखे कीवर्ड वापरू शकता. तुम्ही तुमच्या थीममध्ये दिवाली नाईट किंवा मंदिर पूजासारखे शब्द देखील टाकू शकता. यामुळे तुमचा प्रॉम्प्ट अधिक प्रभावी होईल.

फोटोमध्ये तुमचे कपडे कसे दिसावेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी, तुम्ही तुमच्या कपड्यांचा रंग, डिझाइन आणि स्टाईल स्पष्ट करू शकता. यामुळे फोटो त्याच्या स्वरूपात तयार होण्यास मदत होईल. दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने, तुमच्या फोटोमध्ये लाईट स्किम महत्त्वाची असेल. तुम्ही प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या लाईट स्किमचा देखील उल्लेख करू शकता. या सेटिंग्जने तुमचा फोटो अगदी क्लिअर आणि हटके दिसून येऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!