नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता अशा एका फोनची उत्सुकता लागली आहे ज्याचं नाव आहे iQOO 15. हा फोन २६ नोव्हेंबरला लाँच केला जाणार आहे. iQOO 15 ची डिझाईनचे फोटो आता समोर येत आहेत. यात व्हाईट कलरमध्ये हा फोन दिसून येणार आहे.
iQOO 15 मध्ये चौकोनी कॅमेरा बंप आहे. मागील डिझाइन, जरी साधे असले तरी, गेमर्ससाठी देखील डिझाइन केले आहे. पहिल्यांदा iQOO 15 हा एक सामान्य फोन वाटू शकतो. परंतु, खरा खजिना डिस्प्लेमध्ये आहे. iQoo नेही आधीच सांगितले की, iQoo 15 मध्ये Samsung 2K M14 LED OLED डिस्प्ले दिला जाणार आहे. Samsung 2K M14 LEAD OLED डिस्प्ले म्हणजे कमी पॉवर, इको-फ्रेंडली, ऑगमेंटेड ब्राईटनेस, स्लिम आणि लाईट होण्यासाठी डिझाइन केलेला खास डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा उद्देश बॅटरी वाचवणे आणि हाय ब्राइटनेस देणे हा आहे.
iQoo 15 मध्ये आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनसह, iQoo OriginOS 6 लाँच करणार आहे, जो Android 16 वर चालेल. या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी असणार आहे. ती 100W फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. याचा अर्थ असा की गेमर्सना या फोनसह डिव्हाइस चार्ज करण्यात कमी वेळ लागेल.


