Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: आयटी इंजिनिअरचे 14 कोटी लुबाडणाऱ्या भोंदूबाबाला अटक; वेदिका पंढरपूरकरसह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune: आयटी इंजिनिअरचे 14 कोटी लुबाडणाऱ्या भोंदूबाबाला अटक; वेदिका पंढरपूरकरसह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे: मुलींचा ग्रहदोष बरा करण्याच्या नावाखाली पुण्यातील आयटी इंजिनिअरला 14 कोटींना लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक डोळस असे फसवणूक झालेल्या आयटी अभियंत्याच नाव आहे. त्यांची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. शंकर महाराज अंगात येतात असे सांगून भोंदूबाबासह तिघांनी हा प्रकार घडवून आणला होता. आता पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिघांना नाशिकमधून ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केलीय. याप्रकरणी स्वतः देव सांगणारी वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर, मांत्रिक दीपक खडके असे पकडलेल्या तिघांचे नावे आहेत.

याप्रकरणी पुण्यातील आयटी इंजिनिअर दीपक डोळस यांनी पोलिसांत तक्रार केली होती. दोन्ही मुलींच्या दोषनिवारण करण्याचे नावाखाली डोळस यांना या तिघांनी अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले होते. परंतु थोडी थिडके नव्हे तर चौदा कोटी रुपये आपल्या बँक खात्यावर वेदिका पंढरपूरकर आणि तिच्या साथादीरांनी घेतले होते.

दीपक डोळस यांच्या कुटुंब कसे अडकले?

वेदिका पंढरपूरकर हिने तुमच्या मुलींना ग्रहदोष आहे, असे डोळस कुटुंबाला सांगितले. हा दोष दूर करायचा असेल तर तुमचे सगळे पैसे, मालमत्ता माझ्या खात्यात ठेवा असे सांगितले. वेदिका पंढरपूरकर ही स्वतःला शंकर महाराजांचा अवतार असल्याचा सांगत होती. तसेच डोळस यांच्या घरात पूजा अर्चा करत होती. त्यामुळे डोळस कुटुंबाचा तिच्यावर विश्वास बसला. तेथून वेदिका पंढरपूरकरने कुटुंबाला लुटण्याचे ठरविले. त्या डोळस यांना इंग्लंडमधील राहते घर विकण्यास सांगितले.

चौदा कोटी रुपयांना गंडविले !

त्यानंतर सर्व पैसे वेदिका पंढरपूरकरच्या बँक खात्यात जमा केले. या कुटुंबाने सर्व बचत व मालमत्ता विक्रीचे असे चौदा कोटी रुपये पैसे वेदिका हिच्या खात्यात जमा केले. त्यानंतर हे तिघे पसार झाले. संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे डोळस कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!