Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: 5 डिसेंबरला राज्यातल्या शाळा बंद राहणार?, मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाच आयोजन

Pune News: 5 डिसेंबरला राज्यातल्या शाळा बंद राहणार?, मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाच आयोजन

पुणे: राज्यभरातल्या शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संप पुकारला आहे. याबाबत नुकतीच पुण्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार आहे. त्या दिवशी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचं मुख्याध्यापक महामंडळाने स्पष्ट केलं आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने हे मोर्चे काढले जाणार आहेत. हे मोर्चे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणार आहेत. हे मोर्चे काढण्या मागे शिक्षकांच्या काही मागण्या आहेत. त्यानुसार राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये ही त्यातील मुख्य मागणी आहे. टीईटी परिक्षा अनिवार्य केल्याचा फटका अनेक शिक्षकांना बसणार असल्याचं बोललं जात आहे.

त्याच बरोबर 15 मार्च 2024 रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करावे. शिवाय जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावी अशी ही मागणी आहे. याशिवाय शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी या तीन प्रमुख मागण्या शिक्षकांच्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही शिक्षकांची मागणी आहे. पण ही मागणी करून ही त्याचा काही एक परिणाम होत नाही. निर्णय ही होत नाही. त्यामुळे शेवटी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने संपाची हाक दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने दिलेल्या या संपाचा परिणाम राज्यातील शाळांवर होणार आहे. सर्व शिक्षक मोर्चात जाणार असल्याने शाळा बंद ठेवल्या जातील. त्या दिवशी शिक्षक शाळेत हजर राहाणार नाहीत. त्यामुळे त्या दिवशी शाळा आपोआप बंद राहाणार आहेत. शुक्रवारी पाच तारीख येत आहे. त्याच दिवशी हा संप पूकारण्यात आला आहे. यासाठी आणखी चार दिवस आहे. तो पर्यंत सरकार काही निर्णय घेतं का याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. तसे काही झाल्यास संप मागे ही घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!