Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली; चार महिन्यांतच सरकारचा मोठा निर्णय

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली; चार महिन्यांतच सरकारचा मोठा निर्णय

Tukaram Mundhe : राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबाबत एक महत्त्वाची प्रशासकीय घडामोड समोर आली आहे. परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाच्या जबाबदारीतून त्यांची मुक्तता करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

यापूर्वी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी ते दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. मात्र सध्या ते अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असल्याने पालक सचिवपदाची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.

आता ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे परभणीच्या पालक सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि विकासासंदर्भातील अहवाल शासनाकडे सादर करणे ही पालक सचिवांची प्रमुख जबाबदारी असते.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. विविध ठिकाणी छापे टाकून त्यांनी अन्न व औषधांमधील भेसळीचे प्रकार उघडकीस आणले असून अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत असून भेसळविरोधातील मोहिमेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

मुंढे यांच्याकडून पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असली तरी त्यांच्या सध्याच्या पदावरील कारवाईच्या धडाक्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!