Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalyan Dombivli Election : मतदानाआधीच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पहिला विजय; कोण आहे तो नगरसेवक?

Kalyan Dombivli Election : मतदानाआधीच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पहिला विजय; कोण आहे तो नगरसेवक?

Kalyan Dombivli Mahapalika Election : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावाच्या भागात आणि शिंदे सेनेच्या बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या महिला उमेदवार रेखा राजन चौधरी यांना मतदानाआधीच विजय मिळाला आहे.

प्रभाग क्रमांक १८ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव) या जागेवर फक्त रेखा चौधरी यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, विरोधात एकही अर्ज न आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, “प्रभाग १८ अ साठी केवळ भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचाच वैध अर्ज प्राप्त झाला. इतर कोणत्याही पक्ष किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.” याबाबतची अधिकृत घोषणा आणि प्रमाणपत्र वितरण १६ जानेवारी २०२६ रोजी (मतमोजणीच्या दिवशी) होणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागा असून, येथे शिंदे सेना आणि भाजप युतीत निवडणूक लढवत आहेत. मात्र, या प्रभागात शिंदे सेनेने किंवा इतर पक्षांनी उमेदवार न उभा केल्याने भाजपला थेट फायदा झाला. नामांकन माघारीचा आज (३१ डिसेंबर) शेवटचा दिवस असून, इतर प्रभागांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. मात्र, हा बिनविरोध विजय भाजपसाठी निवडणुकीच्या आधीच मोठा गुलाल ठरला आहे.

या विजयामुळे भाजपची मनोबल वाढले असून, महायुतीच्या प्रचाराला बळ मिळाले आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!