Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर, तासभर चर्चा

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर, तासभर चर्चा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दोघांची भेट झाली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ही भेट घडवून आणल्याचे देखील सूत्रांच्या हवाल्याने टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. जयंत पाटील यांच्या मनात पक्षबदलाचा विचार सुरू असल्याचे सांगतानाच याच कारणातून त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघा नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. या चर्चेवेळी भाजपचे ज्येष्ठ मंत्रीही बैठकीला उपस्थित होते

विशेष गोष्ट म्हणजे, गेल्या आठवड्यात जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी महाराष्ट्राची उदात्त राजकीय संस्कृती विषद करीत नितीन गडकरी राष्ट्रवादीत येणार, असे म्हणू नका, अशी टोलेबाजी यावेळी केली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!