Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात; क्रेटा कारने दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात; क्रेटा कारने दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू

Kolhapur Accident : कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या शाहू मिल चौकात आज एका भीषण अपघाताने खळबळ उडाली. एका सुसाट ‘क्रेटा’ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या मधोमध उलटली, तर दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शाहू मिल चौकातून जात असताना वेगात असलेल्या क्रेटा कारने दुचाकीला उडवले. या धडकेमुळे दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्याशेजारील मोकळ्या जागेत फेकले गेले. डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेमार्फत सीपीआर (CPR) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा – अजित पवार विमान अपघातात नवा ट्विस्ट! लँडिंगचा निर्णय कुणाचा? तपासात धक्कादायक माहिती समोर

वाहतूक कोंडी आणि पोलिसांची धाव
अपघातानंतर कार पलटी झाल्याने आणि बघ्यांची गर्दी जमल्याने शाहू मिल चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने उलटलेली कार बाजूला करण्यात आली आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक पूर्ववत केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!