Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai-Pune Missing Link: जागतिक विक्रमासह ‘मिसिंग लिंक’ प्रवाशांच्या सेवेत! मिसिंग लिंक’चे दिमाखात लोकार्पण; मुख्यमंत्र्यांनी स्वतः चालवली कार

Mumbai-Pune Missing Link: जागतिक विक्रमासह ‘मिसिंग लिंक’ प्रवाशांच्या सेवेत! मिसिंग लिंक’चे दिमाखात लोकार्पण; मुख्यमंत्र्यांनी स्वतः चालवली कार

Mumbai-Pune Missing Link: मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना अधिक जवळ आणणाऱ्या बहुप्रतिक्षीत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा उल्लेख ‘मिसिंग लिंक नव्हे, तर कनेक्टिंग लिंक’ असा केला.

एकाच कारमध्ये मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्र्यांनी साभाळले स्टिअरिंग
उद्घाटनानंतर एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच कारमधून या नवीन मार्गावर स्वार झाले. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्र्यांनी गाडी चालवत या आधुनिक मार्गावरून प्रवासाचा अनुभव घेतला. प्रवासादरम्यान त्यांनी बोगद्यांमधील अद्ययावत सुरक्षा यंत्रणेची आणि कामाच्या दर्जाची पाहणी केली.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
या प्रकल्पाने लोकार्पणापूर्वीच जागतिक पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. या प्रकल्पातील बोगदा तब्बल 23.5 मीटर रुंद असून, तो जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा ठरला आहे. या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली असून, सोहळ्यादरम्यान त्याचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.

प्रवाशांना काय फायदा होणार?

  • वेळेची बचत: लोणावळा घाटातील अवघड वळणे आता इतिहास जमा होणार असून, प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
  • सुरक्षित प्रवास: चढ-उतार आणि वाहतूक कोंडी टाळता येणार असल्याने प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल.
  • अभियांत्रिकीचा आविष्कार: टायगर व्हॅलीवरील भव्य केबल-स्टेड पूल आणि अवाढव्य बोगदे हे भारतीय अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहेत.

प्रकल्पाचा प्रवास
2019 मध्ये सुरू झालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक आव्हाने पार करून आज पूर्णत्वास आला आहे. या नवीन दुव्यामुळे इंधनाची बचत होणार असून, दोन्ही शहरांमधील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे. आजपासून हा मार्ग सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाला असून, यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतुकीचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!