Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sureshkumar Jethaliya : माजी आमदार आणि अजित पवारांचे विश्वासू नेते हरपले; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळहळ

Sureshkumar Jethaliya : माजी आमदार आणि अजित पवारांचे विश्वासू नेते हरपले; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळहळ

Sureshkumar Jethaliya : जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पहाटेच्या सुमारास झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 64 वर्षांचे होते.

सुरेशकुमार जेथलिया हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तसेच जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पक्षांत काम करत आपला ठसा उमटवला. 2004 मध्ये शिवसेनेकडून त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली होती. 2009 मध्ये त्यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आणि आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी निष्कासित केले होते.

यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या.

स्थानिक पातळीवरही त्यांचा मोठा प्रभाव होता. तब्बल 25 वर्षे परतूर नगरपालिका त्यांच्या प्रभावाखाली राहिली. त्यांच्या निधनामुळे परतूर-मंठा परिसरात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!