Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरताय? तर तुमच्यासाठी RBI चा ‘हा’ नियम ठरेल फायदेशीर…

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरताय? तर तुमच्यासाठी RBI चा ‘हा’ नियम ठरेल फायदेशीर…

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवीन नियमांद्वारे क्रेडिट कार्ड ग्राहकाला मोठा दिलासा दिला आहे. या नियमांनुसार, देय तारीख (Due Date) उलटून गेल्यानंतरही तुम्हाला आता दंड टाळण्याची संधी आहे. सामान्यतः, बिल भरण्यास उशीर झाल्यास अनेकदा अतिरिक्त शुल्क आकारले जाते, परंतु आता असे होणार नाही.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांनी देय तारीख चुकवल्यास बँका आता त्वरित विलंब शुल्क आकारू शकणार नाहीत. त्यांना त्यांच्या ग्राहकांना अतिरिक्त ३ दिवसांची मुदत देणे आवश्यक असेल. म्हणजेच, जर तुमची देय तारीख ५ तारीख असेल, तर तुम्ही ८ तारखेपर्यंत कोणतेही विलंब शुल्क न आकारता तुमचे बिल भरू शकाल. यासाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. नवीन नियमांनुसार, विलंब शुल्क संपूर्ण बिलाच्या रकमेवर नव्हे, तर केवळ थकबाकीच्या रकमेवर आकारले जाईल. यामुळे व्याज कमी होईल.

दरम्यान, ३ दिवसांची सवलत मुदत संपल्यानंतरच तुमचे खाते थकीत मानले जाईल. याचा अर्थ असा की, तीन दिवसांनंतर तुमचे बिल न भरल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. आरबीआयचा हा नवीन नियम क्रेडिट कार्ड ग्राहकांना निश्चितच मोठा दिलासा देईल, परंतु तुमचे बिल वेळेवर भरणेच उत्तम आहे. यामुळे तुम्ही विलंब शुल्क आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवरील नकारात्मक परिणामांच्या चिंतेपासून वाचाल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!