Ajit Pawar Crash Probe: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात आता नवा ट्विस्ट आला आहे. ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) आणि ‘DGCA’ च्या पथकांनी आपला तपास विमानाने लँडिंगसाठी केलेल्या त्या ‘दुसऱ्या’ धोकादायक प्रयत्नावर केंद्रित केला आहे. बारामतीच्या धावपट्टीवर विमानाला अपघात झाला की तो घडवून आणला गेला, याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा आता ‘डेथ कमांड’च्या शक्यतेवर काम करत आहेत.
तपासाचे ४ मुख्य ‘पॉइंट्स’ आणि तांत्रिक पैलू
तपास यंत्रणांच्या रडारवर सध्या चार महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिले म्हणजे, अपघातावेळी बारामतीत दाट धुके होते आणि दृश्यमानता केवळ 800 मीटर असतानाही वैमानिकाने लँडिंगचा धोका का पत्करला? दुसरे, लँडिंगचा निर्णय वैमानिकाचा स्वतःचा होता की कोणाच्या तरी दबावाखाली त्याने ही ‘कमांड’ पाळली? तिसरे, विमानाने दुसऱ्यांदा वळण (Approach) घेतले तेव्हा इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता का? आणि चौथे, दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा ‘लँडिंग अँगल’ चुकून ते धावपट्टीऐवजी बाजूला कोसळले का? या तांत्रिक बाजूंचा कसून अभ्यास केला जात आहे.
‘गो-अराउंड’ नंतरची ती चूक जीवावर बेतली?
तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या प्रयत्नात धुके असल्याने वैमानिकाने ‘गो-अराउंड’ (विमान पुन्हा हवेत घेणे) चा सुरक्षित निर्णय घेतला होता. मात्र, काही क्षणांतच दुसऱ्यांदा प्रयत्न करताना, धावपट्टी स्पष्ट दिसत नसतानाही विमान उतरवण्याचा ‘अंतिम निर्णय’ कोणाचा होता, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हाच निर्णय अपघाताला निमंत्रण देणारा ठरला का, या दृष्टीने तपास सुरू आहे.
ब्लॅक बॉक्स आणि सीआयडीचा तपास
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्यातील डेटावरून विमानातील अखेरच्या संभाषणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सीआयडीने अजितदादांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांची 4 तास कसून चौकशी केली आहे. या प्रवासासाठी याच विमानाची निवड का केली गेली आणि नियोजनात ऐनवेळी बदल झाले होते का, याचे धागेदोरे पोलीस शोधत आहेत. या चौकशीतून समोर येणारी माहिती राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवू शकते.


