Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

श्रीरामपूर हादरलं..! कौटुंबिक वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांना संपवलं, परिसरात खळबळ

श्रीरामपूर हादरलं..! कौटुंबिक वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांना संपवलं, परिसरात खळबळ

Shrirampur Crime : श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. किरकोळ कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी आशपाक बागवान (वय ३०) याने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुसा हसन बागवान (वय ६५) यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

किरकोळ कारणातून मुलाने वडिलांचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!