Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sunil Tatkare: ‘अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय आणि सीआयडी चौकशी व्हावी’; अपघाताच्या प्राथमिक अहवालवर सुनील तटकरेंकडून असंतोष व्यक्त

Sunil Tatkare: ‘अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय आणि सीआयडी चौकशी व्हावी’; अपघाताच्या प्राथमिक अहवालवर सुनील तटकरेंकडून असंतोष व्यक्त

Sunil Tatkare: “अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.

सुनील तटकरे यांनी रविवारी श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, या प्रकरणाची सीबीआय आणि सीआयडी चौकशी व्हावी, ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. प्राथमिक अहवालातील त्रुटींकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या शंका आणि भावनांची दखल घेऊन तपास यंत्रणांनी अधिक सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

अशोक खरात आणि तत्सम प्रकरणांवरही तटकरे यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “खरात असो किंवा अन्य कोणीही, अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना समाजात थारा मिळता कामा नये. अशा प्रकरणांचा तपास जलदगती न्यायालयात करून दोषींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करावा, असेही त्यांनी सरकारला सुचवले.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन

अजित दादांच्या निधनाचे दुःख व्यक्त करताना तटकरे म्हणाले की, “दादांनी ४० वर्षे महाराष्ट्र घडवण्यासाठी काम केले, ते आज आमच्यात नाहीत याचे मोठे शल्य आहे.” बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आवाहन केले की, ही निवडणूक अत्यंत संवेदनशील परिस्थितीत होत असून सुनेत्रा वहिनी यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!