Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Porsche Crash Case: जेलवारी झाली, बदनामी झाली, पण माज कायम! विशाल अग्रवालचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Pune Porsche Crash Case: जेलवारी झाली, बदनामी झाली, पण माज कायम! विशाल अग्रवालचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Pune Porsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघातातील मुख्य आरोपीचा पिता आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या एका नव्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. दोन निष्पाप आयटी इंजिनिअर्सचा जीव घेणाऱ्या या भीषण प्रकरणातील आरोपींना कोर्टाने काही अटींवर जामीन मंजूर केला होता. मात्र, महिनाभरापूर्वीच तुरुंगातून बाहेर आलेल्या अग्रवाल कुटुंबाने सर्व नियम, अटी आणि सामाजिक भान पूर्णपणे धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. या कुटुंबाने एकत्र येत एका जंगी पार्टीत जल्लोष केल्याचे समोर आले असून, या पार्टीचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोन तरुणांचा बळी गेल्यानंतर आणि संपूर्ण देशात प्रचंड बदनामी होऊनही अग्रवाल कुटुंबाचा हा मस्तवालपणा पाहून सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गळ्यात नोटांचे हार घालून बेधुंद डान्स; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण अग्रवाल कुटुंब ‘मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो…’ या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर जोरदार नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अपघातातील मुख्य आरोपीचा पिता विशाल अग्रवाल आणि त्याची पत्नी गळ्यात चक्क नोटांचे मोठे हार घालून बेधुंद होऊन डान्स करत आहेत. या भीषण अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाला दीर्घकाळ कायदेशीर कारवाई आणि जेलवारीला सामोरे जावे लागले होते. कोर्टाने त्यांना जामीन देताना काही कठोर अटीही घातल्या होत्या. परंतु, इतकी मोठी आणि गंभीर घटना घडूनही या कुटुंबाच्या मानसिकतेत आणि वर्तनात कोणताही फरक पडलेला नाही, हेच या पैशांच्या उघड प्रदर्शनावरून आणि व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. या नव्या प्रकारामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे.

मुलाला वाचवण्यासाठी रचले होते कटकारस्थान; न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या या अपघातानंतर आपल्या अल्पवयीन मुलाला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाने आणि त्यांच्या साथीदारांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. यामध्ये आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्याचा एक मोठा आणि धक्कादायक प्रयत्न करण्यात आला होता. या रक्त फेरफार प्रकरणातील सह-आरोपींनी अटकेपासून वाचण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती, जिथे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. इतक्या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर आता या प्रकरणातील प्रमुख आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. मात्र, बाहेर येताच त्यांनी केलेल्या या जाहीर जल्लोषामुळे पोलिसांच्या कारवाईवर आणि न्यायव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!