Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीड पुन्हा हादरले! दलित तरुणाला दोरीने बांधून अमानुष मारहाण; दुकानातच केली हत्या

बीड पुन्हा हादरले! दलित तरुणाला दोरीने बांधून अमानुष मारहाण; दुकानातच केली हत्या

Beed Crime : बीड शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, एका दलित तरुणाला दोरीने बांधून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या संतोष देशमुख प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

मृत तरुणाचे नाव उमेश दळवी असल्याची माहिती समोर आली आहे. तो बीड शहरातील एका दुकानात काम करत होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही छायाचित्रांमध्ये उमेशला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी उमेशने आपल्या पत्नीला फोन करून जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. “मला इथे मारणार आहेत,” अशी भीती त्याने पत्नीसमोर व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. पत्नीच्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास उमेशचा फोन आला होता. त्यानंतर पहाटे तीन वाजता दुकानातील लोकांनी फोन करून उमेशची तब्येत बिघडल्याचे सांगत त्याला रुग्णालयात नेल्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

मृत उमेशच्या पत्नीने आरोपींवर गंभीर आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे. “माझ्या पतीला मारहाण करून ठार मारण्यात आले. आरोपींना सोडू नका,” अशी आर्त हाक तिने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींवर खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!