Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राष्ट्रवादीत मोठा राडा? सुनील तटकरेंचा बैठकीत संतापाचा स्फोट; भुजबळांनाही सुनावलं!

राष्ट्रवादीत मोठा राडा? सुनील तटकरेंचा बैठकीत संतापाचा स्फोट; भुजबळांनाही सुनावलं!

Sunil Tatkare : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा झाल्याची माहिती समोर आली आहे. देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. मी आणि प्रफुल पटेलच टीकेचे धनी का? आम्हालाच कायम विलन ठरवलं जातं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विलीनीकरणाच्या चर्चेपासून पक्षातील घडामोडींमध्ये आम्हीच लक्ष्य झालो, पण आमच्या समर्थनार्थ एकही नेता पुढे आला नाही, अशी खंत तटकरेंनी बोलून दाखवली. यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तटकरे आणखी आक्रमक होत मी यावर बोलणारच, स्पष्टता झाली पाहिजे, असे म्हणत भुजबळांनाही सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे तटकरेंचं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्याचीही चर्चा आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!