Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Imtiaz Jaleel Statement: ‘मदत मागितली असती तर मी नक्कीच…’; निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांचा मोठा खुलासा

Imtiaz Jaleel Statement: ‘मदत मागितली असती तर मी नक्कीच…’; निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांचा मोठा खुलासा

Imtiaz Jaleel On Nida Khan: नाशिकमधील एका आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम (MIM) नेत्यांना लक्ष्य केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “निदा खान केवळ संशयित आरोपी आहे, गुन्हेगार नाही. तिने माझ्याकडे मदत मागितली असती, तर मी सुद्धा तिला नक्कीच सहकार्य केले असते,” असे जलील यांनी ठामपणे म्हटले आहे.

‘आरोप म्हणजे गुन्हा नव्हे’
इम्तियाज जलील यांनी निदा खानची पाठराखण करताना कायद्याचा दाखला दिला. ते म्हणाले जोपर्यंत न्यायालय कोणाला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती केवळ आरोपी असते. आरोप कोणावरही केले जाऊ शकतात. “जर निदाचा संबंध कोणत्या दहशतवादी कृत्याशी असता, तर पोलिसांनी आतापर्यंत ‘लूकआऊट नोटीस’ का काढली नाही? तिच्यावर केवळ धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप असताना तिला एखाद्या मोठ्या गुन्हेगारासारखे का वागवले जात आहे?” असा सवाल जलील यांनी उपस्थित केला.

पालकमंत्र्यांच्या आरोपांना दाखवली केराची टोपली
संजय शिरसाट यांनी या प्रकरणात जलील यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती. यावर सडेतोड उत्तर देताना जलील म्हणाले, “मी पालकमंत्र्यांना काडीचाही भाव देत नाही. मला कोणाला उत्तर द्यायचे असेल तर ते पोलीस आयुक्तांना देईन. पोलीस तपासात मी १०० टक्के सहकार्य करायला तयार आहे, मग ते नाशिकचे पोलीस असोत की संभाजीनगरचे.”

‘तरुणीला संविधानिक अधिकार’
निदा खानच्या कायदेशीर हक्कावर भाष्य करताना जलील म्हणाले की, प्रत्येक आरोपीला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचा घटनात्मक अधिकार आहे. “तिला उच्च न्यायालयात जामीन मिळालाच असता, पण आता तिला पकडल्यानंतर थेट फाशीवर लटकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा दावाही त्यांनी केला.

पक्षाची भूमिका स्पष्ट
जलील यांनी पुढे स्पष्ट केले की, त्यांनी निदा खानला आधीच सांगितले होते की, जर तिची चूक असेल तर पक्ष पाठीशी उभा राहणार नाही. मात्र, जर तिची बाजू खरी असेल, तर पूर्ण ताकदीने तिला न्याय मिळवून देऊ. निदा खान हिच्या अटकेमागे केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!