Thalapathy Vijay : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर टीव्हीके प्रमुख थलपती विजय यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत अवघ्या काही मिनिटांत तीन महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली. प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करत विजय यांनी जनतेला मोठा दिलासा दिल्याने राज्यभर त्यांच्या निर्णयांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक क्षणी काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुलाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून विजय यांचे वडील चंद्रशेखर भावूक झाल्याचे दृश्यही चर्चेचा विषय ठरले.
- शपथविधीनंतर विजय यांनी घेतलेले 3 मोठे निर्णय असे
- राज्यातील नागरिकांना 200 युनिट मोफत वीज
- अमली पदार्थांविरोधात विशेष टास्क फोर्सची स्थापना
महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विशेष सुरक्षा दल
मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय म्हणाले की, “मी कोणत्याही राजकीय घराण्यातून आलो नाही, जनतेच्या विश्वासामुळेच या पदापर्यंत पोहोचलो.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विजय यांचे अभिनंदन करत केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकासासाठी राज्य सरकारसोबत सहकार्य करेल, असे म्हटले आहे.


