Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics : प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित? ३० मेची तारीख चर्चेत, विधानपरिषद उमेदवारीचीही जोरदार चर्चा

Maharashtra Politics : प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित? ३० मेची तारीख चर्चेत, विधानपरिषद उमेदवारीचीही जोरदार चर्चा

Maharashtra Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री असलेले तनपुरे हे ३० मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्याचबरोबर भाजपकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजप तनपुरेंना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असतानाच भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आहेत.

“२००९ पासून पक्ष आदेश पाळत आलो, आता निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळावी,” अशी प्रतिक्रिया सत्यजित कदम यांनी दिल्याने स्थानिक भाजपमध्येही चर्चांना उधाण आले आहे. भाजपने तनपुरेंना उमेदवारी दिल्यास स्थानिक कार्यकर्ते कोणाच्या बाजूने उभे राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे हे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणीवस यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. राहुरी पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क रंगले होते.

विशेष म्हणजे तनपुरे यांनी अलीकडेच फेसबुकवरील प्रोफाईल फोटोमध्ये जयंत पाटील यांचा फोटो लावल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. हा भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा रंगत आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेले वक्तव्यही सध्या चर्चेत आहे. तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. तसेच २०२४ विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारल्याचेही त्यांनी सांगितले होते.

तनपुरेंच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!