Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

उन्हामुळे तुमचे केस चिकटत आहेत? अशाप्रकारे घ्या काळजी, होईल फायदा…

उन्हामुळे तुमचे केस चिकटत आहेत? अशाप्रकारे घ्या काळजी, होईल फायदा…

उन्हाळा सुरु झाला की उकाडा आणि घाम दोन्हीचा त्रास वाढतो. शरीर घामामुळे चिकट होतं. त्यामुळे दिवसातून २-३ वेळा आंघोळ करावीशी वाटते. पण इतकंच नाही, तर केसात आलेल्या घामामुळे टाळूवर सुद्धा याचा परिणाम जाणवतो. केसांच्या मुळांमध्ये घाम साचल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची आणि टाळूची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.

घामामुळे स्कॅल्प तसाच ओलसर राहतो. आणि वेळेवर डोकं स्वच्छ नाही केलं, तर हा ओलसरपणा बुरशीला कारणीभूत ठरते. त्यामुळे कोंडा, कोरड्या त्वचेसारखे खवले निघणं आणि सतत खाज येण्याची समस्या निर्माण होते. जास्त घाम आला आणि तो टाळूतील नैसर्गिक तेलात मिसळला की केस लगेचच चिकट आणि तेलकट दिसायला लागतात. टाळूही जड वाटू लागते आणि कधी कधी वासही येतो. त्यामुळे केस फ्रेश आणि स्वच्छ दिसत नाहीत.

केस गळण्याची शक्यता

टाळूवर सतत घाम आणि घाण राहिली तर केसांच्या मुळांना त्रास होतो. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि जास्त गळू लागतात. म्हणून टाळू स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे.

हायड्रेशन आणि आहार महत्त्वाचा

पुरेसं पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. यामुळे केस आणि टाळू आतून निरोगी राहतात. जास्त प्रॉडक्ट्स टाळा. जेल, स्प्रे किंवा जड स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरल्यास घाम आणि धूळ केसांमध्ये अडकते. त्यामुळे शक्यतो हलके प्रॉडक्ट्स वापरा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!