Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shrikant Shinde Convoy Accident : शिवसंवाद दौऱ्यादरम्यान श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या अन्…

Shrikant Shinde Convoy Accident :  शिवसंवाद दौऱ्यादरम्यान श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या अन्…

Shrikant Shinde Convoy Accident : शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ‘शिवसंवाद’ दौऱ्यादरम्यान नांदेडमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. शहरात एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात खासदार आणि आरोग्य मंत्र्यांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांना पाठीमागून जोरदार धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अचानक ब्रेक दाबल्याने वाहने धडकली
खासदार श्रीकांत शिंदे आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नायगाव येथील बैठकीसाठी जात असताना गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास अण्णाभाऊ साठे चौकात हा अपघात झाला. ताफ्यासमोर अचानक एक बाईकस्वार आल्यामुळे पुढील वाहनाने तातडीने ब्रेक लावला. परिणामी, मागून येणाऱ्या चार गाड्या एकामागोमाग एकमेकांवर आदळल्या. या वाहनांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी होते. या भीषण धडकेत गाड्यांचे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

ट्रॅक्टर उलटल्याने दोन सख्ख्या भावांसह मामाचा जागीच अंत
दुसऱ्या एका हृदयद्रावक घटनेत, नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे एक भरधाव ट्रॅक्टर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा आणि त्यांच्या मामाचा ट्रॅक्टरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सोनई आणि खरवंडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

शाळेच्या सुट्ट्यांमध्ये काळाचा घाला:
सोनई येथील व्यावसायिक गणेश दरंदले यांची मुले अभिषेक (१६ वर्षे) आणि विजय (१४ वर्षे) यांना शाळेला सुट्ट्या असल्याने ते बुधवारी सकाळी खरवंडी येथील आपले मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे फिरायला गेले होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास त्यांचा प्रवास जीवघेणा ठरला. वेगात असलेले ट्रॅक्टर अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटले. या ट्रॅक्टरखाली दबले गेल्याने अभिषेक, विजय आणि मामा रामेश्वर या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दोन कुटुंबांतील हसतीखेळती माणसे एका क्षणात हिरावली गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!