Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Akole Child Marriage Case: अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! अकोले तालुक्यात तब्बल 56 अल्पवयीन मुली गरोदर; अंगणवाडी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Akole Child Marriage Case: अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! अकोले तालुक्यात तब्बल 56 अल्पवयीन मुली गरोदर; अंगणवाडी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Akole Child Marriage Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून बालहक्कांचे आणि कायद्याचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महिला आणि बालविकास विभागाने केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात, एकट्या अकोले तालुक्यामध्ये 55 विवाहित अल्पवयीन मुली आणि 1 अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यातील काही मातांनी अत्यंत कमी म्हणजेच बालवयातच बाळांना जन्मही दिला आहे. या विदारक आणि गंभीर खुलाशामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, ग्रामीण भागातील बालविवाहांचे भीषण वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

 ‘मातृत्व वंदना’ योजनेच्या छाननीतून सत्य आले समोर
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका दरमहा आपापल्या भागात गरोदर व स्तनदा मातांची नियमित नोंदणी आणि सर्वेक्षण करतात. या प्रक्रियेदरम्यानच ही धक्कादायक आकडेवारी प्रशासनाच्या हाती लागली. केंद्र सरकारच्या ‘मातृत्व वंदना योजने’चा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी जेव्हा काही लाभार्थ्यांचे अर्ज आले, तेव्हा त्यांच्या कागदपत्रांची छाननी करताना या माता कायदेशीर वयापेक्षा कमी म्हणजेच अल्पवयीन असल्याचे उघड झाले. सामाजिक प्रतिष्ठा, बदनामीची भीती आणि पोलिसांच्या कारवाईचा धाक यामुळे ग्रामीण भागात अनेक बालविवाहांची अधिकृत नोंदच केली जात नाही. ‘मुलगी पळून जाऊन लग्न करेल’ या भीतीने अनेक पालक वयात येण्यापूर्वीच मुलींचे हात पिवळे करत असल्याने, कागदोपत्री आलेल्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष गरोदर अल्पवयीन मुलींचा आकडा कितीतरी पटीने अधिक असण्याची भीती वर्तवली जात आहे.

राज्य बालहक्क आयोगाकडे धाव
या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाची अकोले येथील बालसंरक्षण समितीचे अशासकीय सदस्य श्रीनिवास रेणुकादास यांनी तीव्र दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी थेट ‘महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग’ आणि जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील बालविवाहाची ही साखळी तोडण्यासाठी गाव पातळीवरील ‘बाल संरक्षण समित्या’ केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात सक्रिय करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, विवाह नोंदणी करताना किंवा लग्न लावताना वधू-वरांचे अधिकृत जन्मदाखले (Age Proof) तपासणे सक्तीचे करावे आणि कायद्याचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या पुरुषांवर, तसेच या विवाहाला पाठिंबा देणाऱ्या पालकांवर आणि पुरोहितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!