Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! धुळे महानगरपालिकेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदांवर केली जाणार भरती

Job Alert ! धुळे महानगरपालिकेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदांवर केली जाणार भरती

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, धुळे महानगरपालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.

धुळे महानगरपालिकेत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धुळे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.dhulecorporation.org/  या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी.

– एकूण रिक्त पदे : 12 पदे.

– नोकरीचे ठिकाण : धुळे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

– अर्ज शुल्क : रु. १०००/- (ऑनलाईन स्वरुपात)

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ जून २०२६.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : १५ जून २०२६ सकाळी ११:०० वाजता.

– मुलाखतीचा पत्ता : अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!