पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आयसीएमआर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन विमेन्स हेल्थ, मुंबई येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक II (गैर-वैद्यकीय), प्रकल्प संशोधन वैज्ञानिक I (गैर-वैद्यकीय) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. १० जून २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nirrh.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प संशोधन वैज्ञानिक II (गैर-वैद्यकीय), प्रकल्प संशोधन वैज्ञानिक I (गैर-वैद्यकीय)
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२६


