Today गुरूवार, 28th मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gram Panchayat Elections: कोल्हापुरात ४३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक बिगुल; गावागावात राजकीय मोर्चेबांधणी सुरू

Gram Panchayat Elections: कोल्हापुरात ४३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक बिगुल; गावागावात राजकीय मोर्चेबांधणी सुरू

Gram Panchayat Elections: कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून, तब्बल ४३३ ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. आधीच गोकुळ दूध महासंघाच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण वातावरण तापले असताना, आता गावपातळीवरील राजकीय समीकरणांनाही वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विशेष ग्रामसभांमधून आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, १२ जून रोजी आरक्षण सोडत पार पडणार असून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्व, गटबाजी आणि राजकीय हालचालींना आता अधिक वेग येणार असल्याचे मानले जात आहे.

निवडणूक प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, आरक्षण प्रक्रियेसाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून आरक्षणाची सोडत तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

८ जून – विशेष ग्रामसभा
१२ जून – आरक्षण सोडत
१७ जून – प्रारूप अधिसूचनेस मान्यता
१९ जून – प्रारूप आरक्षण जाहीर
१९ ते २५ जून – हरकती आणि सूचना स्वीकारणे
२३ जुलै – उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय
८ जुलै – अंतिम अधिसूचनेस मान्यता
१० जुलै – अंतिम आरक्षण प्रसिद्ध
गोकुळच्या राजकारणाचा गावागावात प्रभाव

गेल्या काही आठवड्यांपासून गोकुळ दूध महासंघाच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक दूध संस्था गोकुळशी जोडलेल्या असल्याने त्याचे पडसाद थेट ग्रामपंचायत निवडणुकांवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या विविध संस्थांमध्ये ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून, कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा यावरून स्थानिक स्तरावर राजकीय चुरस वाढत आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्याने गावागावातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढत

या निवडणुकांकडे केवळ ग्रामपंचायत निवडणूक म्हणून न पाहता आगामी मोठ्या राजकीय समीकरणांची रंगीत तालीम म्हणूनही पाहिले जात आहे. गावपातळीवर प्रभाव निर्माण करण्यासाठी विविध राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पुढील काही आठवड्यांत जिल्ह्यातील राजकारण आणखी रंगण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!