Today गुरूवार, 28th मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Nasrapur Case: PM रिपोर्ट, मेडिकल पुरावे अन् जोरदार युक्तिवाद… नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश; 28 दिवसांत कोर्टाची मोठी कारवाई

Pune Nasrapur Case: PM रिपोर्ट, मेडिकल पुरावे अन् जोरदार युक्तिवाद… नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश; 28 दिवसांत कोर्टाची मोठी कारवाई

Pune Nasrapur Case: नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला असून, अवघ्या २८ दिवसांत महत्त्वाची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. गुरुवारी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपीवर गंभीर आरोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान पोलिसांनी पोस्टमार्टम अहवालासह विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल न्यायालयात सादर केले. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र, आरोपीच्या बाजूने कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने भीमराव कांबळे याच्याविरोधातील आरोप निश्चित केले.

१५ दिवसांत चार्जशीट दाखल

या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करत पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आता केवळ २८ दिवसांत आरोप निश्चित होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या खटल्याची सुनावणी आता दररोज होणार असून ती ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेतली जाणार आहे.

वरिष्ठ अधिकारी न्यायालयात उपस्थित

या महत्त्वाच्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, तक्रारदार पक्षाचे वकील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल तसेच तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणात जलद गतीने तपास करत पुरावे गोळा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल

आरोपी भीमराव कांबळे याच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ‘पोक्सो’ कायद्यांतर्गतही त्याच्यावर लैंगिक अत्याचारासंदर्भातील गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आता न्यायालयाने हे सर्व आरोप निश्चित केल्याने पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!