Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

२००० रुपयांच्या नोटा बंद, तरीही सहा हजार कोटी रुपयांच्या नोटा वापरात; आरबीआयने दिली महत्वाची माहिती

२००० रुपयांच्या नोटा बंद, तरीही सहा हजार कोटी रुपयांच्या नोटा वापरात; आरबीआयने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली: २००० च्या नोटांबाबत आरबीआयने मोठा खुलासा केला आहे . रिझर्व्ह बँकेने (RBI) २००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर दोन वर्षे उलटूनही, देशात ६,१८१ कोटी रुपयांच्या नोटा अजूनही चलनात आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या नोटा अजूनही कायदेशीर चलन मानल्या जातात.

१९ मे २०२३ रोजी आरबीआयने २००० रुपयांच्या एकूण ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ताज्या आकडेवारीनुसार, ३१ मे २०२५ पर्यंत ही रक्कम ६,१८१ कोटींवर आली आहे. याचा अर्थ एकूण ९८.२६% २००० रुपयांच्या नोटा सिस्टममध्ये परत आल्या आहेत.

२००० च्या नोटा कुठे आणि कशा जमा करायच्या?
७ ऑक्टोबर २०२३ रोजी बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा बंद करण्यात आली असली तरी, लोक अजूनही रिझर्व्ह बँकेच्या १९ जारी कार्यालयांमध्ये त्या जमा करू शकतात.

आरबीआयने असेही सांगितले की लोक त्यांच्या २००० रुपयांच्या नोटा टपाल विभागामार्फत (इंडिया पोस्ट) आरबीआय कार्यालयांना पाठवू शकतात आणि त्या थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २००० रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर चलन आहेत म्हणजेच त्या अवैध घोषित केलेल्या नाहीत. परंतु, या नोटा आता नवीन नोटा म्हणून दिल्या जात नाहीत आणि लोकांना हळूहळू त्या प्रणालीतून काढून टाकण्याचे आवाहन केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!