Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आता शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: राज्यात आता शासकीय विभागीय कारवाईसाठी ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात सरकारने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विभागीय चौकशीतील दोषारोपपत्रे व इतर कागदपत्रे शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ईमेल व व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येणार आहेत.

शासकीय कामकाजात गतिमानता आणि खर्चात बचत होण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञााचा वापर करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय कार्यालयात आता ई-मेल सुविधेचा वापर होत असून आता व्हॉट्सअपचादेखील वापर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाविषयक कारवाईमध्येही सदर माध्यमांचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने काढलेल्या पत्रकामध्ये नेमकं काय ?

शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार अपचाऱ्यास अभिवेदन करण्याची संधी उपलब्ध असणे अत्यावश्यक असते. त्यासाठी त्याचेपर्यंत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचा पत्रव्यवहार पोहोचणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने सद्यस्थितीत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याकडून अपचाऱ्याशी होणारा पत्रव्यवहार व्यक्तीशः अथवा पोच देय नोंदणी डाकेने करण्यात येतो. तथापि, काही वेळेस सदर पत्रव्यवहार (दोषारोपाचे ज्ञापन, चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल इ.) त्याचेपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनांतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अथवा नियम १० याखाली तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ च्या पोट-नियम (२) (ब) (एक) याखाली बजाविण्यात येणारे दोषारोपाचे ज्ञापन तसेच इतर शिस्तभंगविषयक कागदपत्रे संबंधित अपचाऱ्यास बजाविण्याबाबत खालील माध्यमांचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

1) शिस्तभंगविषयक कागदपत्रे व्यक्तिशः बजाविणे: शासकीय कर्मचारी कर्तव्यार्थ

उपस्थित असल्यास शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याकडून त्यास संबंधित कागदपत्रे/पत्रव्यवहार व्यक्तीशः बजाविण्यात यावे किंवा ती त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत देण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि ती कागदपत्रे/पत्रव्यवहार मिळाल्याची त्याच्याकडून पोच घेण्यात यावी.

२) शिस्तभंगविषयक कागदपत्रे पोच देय नोंदणी डाकेने (RPAD) बजाविणे

अपचाऱ्यास पोच देय नोंदणी डाकेने संबधित कागदपत्रे/पत्रव्यवहार पाठविण्यात यावे. उपरोक्त माध्यमांचा अनिवार्यपणे वापर करण्यात यावा. तसेच याद्वारे प्राप्त झालेली पोच प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडून ठेवण्यात यावी.

३) उपरोक्त कार्यवाही सोबतच अपचाऱ्यास अधिक जलदगतीने यासंबंधातील कागदपत्रे/पत्रव्यवहार प्राप्त होऊन त्यास आपले अभिवेदन सादर करता यावे. याकरीता खालील माध्यमांचाही वापर करण्यात यावा

अ) शिस्तभंगविषयक कागदपत्रे शासकीय ई-मेलद्वारे बजाविणे :- शासकीय

ई-मेल आयडी द्वारे संबंधित अपचाऱ्यास त्याच्या शासकीय ई-मेल आयडी वर तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्याच्या वैयक्तिक ई-मेल आयडी वर शिस्तभंगविषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात यावे. (संबंधित अपचाऱ्याने त्याच माध्यमान्वये पोच द्यावी.)

आ) शिस्तभंगविषयक कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बजाविणे :- सेवानिवृत्त

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवर शिस्तभंगविषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात यावे. (संबंधित अपचाऱ्याने त्याच माध्यमान्वये पोच द्यावी.)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!