हडपसर : प. पु. आचार्य आनंदऋषीं यांचे शिष्य, उपाध्याय अर्हम् विज्जा संस्थेचे संस्थापक प. पु. श्री ऋषीं प्रवीण यांचे पुण्य नगरीमध्ये आगमन झाले. समाजातील विविध घटकातील लोकांनी मोठ्या उत्साह आणि आनंदात त्यांचे स्वागत केले. देश भरातील पायी यात्रा करून ते आज पुण्यात आलेले आहे. श्री आदिनाथ स्थानाकवासी जैन भवन ट्रस्ट, पुणे व परिवर्तन चातुर्मास समिती, पुणे यांच्या विनंती अनुसार परिवर्तन चातुर्मास 2025 साठी आगमन झाले.
परंपरागत मार्ग सोडून समस्याच्या मुळात जाऊन जीवनात परिवर्तन आणण्यासाठी परिवर्तन चातुर्मासचे आयोजन केले आहे. मानव जातीतील विविध जटील समस्यांचे समाधानात परिवर्तनकारी बदल घडवण्यासाठी परिवर्तन चातुर्मासचे आयोजन केले आहे.
प. पु. श्री ऋषीं प्रवीण यांचे स्वागत अध्यक्ष राजश्री पारख, चातुर्मास अध्यक्ष सुनील नहार, अर्हम् विज्जा पुणे प्रमुख मधुबाला कटारिया, डॉक्टर कल्याण गंगवाल, विलास राठोड, आर के लुंकड, विजयकांत कोठारी, दिपचंद पारख, बाळासाहेब धोका आदी मान्यवर उपस्थित होते. अर्हं विज्जा परिवाराचे प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल नहार यांनी केले.


