पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या एका विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, धाराशिव येथे आयएफसी ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ सीआरपी (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धाराशिव (उस्मानाबाद) येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी तालुका मोहीम व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, कळंब, कळंब जिल्हा, धाराशिव 413507 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpdharashiv.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


