पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, अकोला बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे क्रेडिट अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : क्रेडिट अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– वयोमर्यादा : क्रेडिट ऑफिसर: २५ वर्षे ते ३५ वर्षे आणि वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी: ३५ वर्षे ते ४५ वर्षे..
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन, ऑफलाइन (हार्ड कॉपीज).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2026.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला “जनकल्याण”, 58-59, तोष्णीवाल लेआउट, दूध योजनेजवळ, मूर्तिजापूर रोड, अकोला – 444001 (M.S.).
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.akolaurban.bank.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


