Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Amol Mitkari: ‘लव्ह यू दादा… तुम्हीच मला जगायला शिकवलं!’; व्हॅलेंटाईन डे निमित्त अमोल मिटकरींचे अजित पवारांना काळजाला भिडणारे पत्र

Amol Mitkari:  ‘लव्ह यू दादा… तुम्हीच मला जगायला शिकवलं!’; व्हॅलेंटाईन डे निमित्त अमोल मिटकरींचे अजित पवारांना काळजाला भिडणारे पत्र

Amol Mitkari: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला १५ दिवस उलटले असले, तरी राजकीय वर्तुळातून आणि कार्यकर्त्यांच्या मनातून त्यांचे अस्तित्व पुसले गेलेले नाही. विमान अपघाताच्या त्या भीषण बातमीवर आजही कोणाचा विश्वास बसत नाहीये. याच पार्श्वभूमीवर, ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित दादांच्या आठवणीत एक अत्यंत भावूक जाहीर पत्र लिहिले आहे.

“भविष्यानं ताटात काय वाढलंय ठाऊक नाही…”
अमोल मिटकरी यांनी आपल्या पत्रातून अजित दादांना ‘लव्ह यू’ म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “दादा असताना त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त करण्याची हिंमत झाली नाही, पण आज ते नसताना हे शब्द ओठावर येत आहेत,” असे मिटकरींनी म्हटले आहे. पत्रातील सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे मिटकरींनी व्यक्त केलेली भविष्याची चिंता. “भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवलंय, हे आता सांगता येणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला आधार हरवल्याचं म्हटलं आहे.

मिटकरींच्या यांच्या पत्रातील मुद्दे

मिटकरी यांनी म्हटलं आहे की, ‘एक सामान्य घरातील मुलगा असूनही तुम्ही मला २०१९ ला पक्षात घेतलं, आमदार केलं, घर उभं करून दिलं आणि समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. वडिलांच्या निधनानंतर मला सावरणारे आणि माझ्या कामावर विश्वास ठेवणारे तुम्हीच होता. अनेकांसाठी मी ‘अप्रिय’ असलो तरी तुम्हाला ‘प्रिय’ होतो, हीच माझी मोठी कमाई. तुमच्या नावाच्या बळावर मी आजवर प्रशासनात वावरलो. शिस्त आणि कामात झोकून देण्याचा मंत्र तुम्हीच दिलात. आज एकादशी आहे, तुमच्यामुळेच मी विठ्ठलाच्या प्रेमात पडलो, पण त्यानेच तुम्हाला हिरावून नेलं. आता त्या विठ्ठलाशी माझं आयुष्यभर भांडण राहील.’

हेही वाचा – Rohit Pawar: अजितदादांच्या मृत्यूचे गूढ वाढले! अपघाताच्या चौकशीत ‘बड्या’ नेत्याचा खोडा; रोहित पवारांनी थेट दिल्लीतून डागली तोफ

अपघाताच्या चौकशीची मागणी
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. ‘दादा आजही आपल्यातच आहेत आणि ते एखाद्या पत्रकार परिषदेत पुन्हा दिसतील,’ अशी आशा आजही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!