Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू

पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू

Parbhani Accident : परभणी-पाथरी मार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघात इतका गंभीर होता की दुचाकीवरील चारही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘NL 01 B 1374’ क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स परभणीहून पुण्याकडे जात होती. मानवत शहराजवळील राहुल जिनिंगसमोर रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रॅव्हल्सची ‘MH 22 BB 4724’ क्रमांकाच्या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात शुभम आप्पाराव दहे (30), विष्णू गोरे (28), प्रल्हाद अशोकराव कुटे (29) आणि नवनाथ शामराव जाधव (38) या मानवत येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच शहरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने मानवत शहरावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!