Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दहा लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावली

दहा लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावली

छत्रपती संभाजीनगर : दोन हॉस्पिटलमध्ये जमा झालेली रक्कम एका बॅग घेऊन डॉक्टरचे वडील घराकडे जात असताना तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोन आरोपींनी काही समजण्याच्या आतच बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेत तब्बल दहा लाख रुपयांची रोख रक्कम होती. ही घटना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी चाटे शाळेजवळ सातारा परिसरात घडली.

या प्रकरणी सखाराम दगडुजी शिंदे (७२, रा. प्लॉटनंबर ४, गट क्रमांक ९६, चाटे शाळेजवळ, सातारा परिसर) हे सेवा निवृत्त आहेत. त्यांच्या मुलाचे हॉस्पिटल रेणुका माताकमानी जवळ आहे. याशिवाय जालना येथे एक हॉस्पिटल आहे. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सखाराम शिंदे हे त्यांच्या मुलांच्या हॉस्पिटलला गेले. तेथे जालना येथील हॉस्पिटलचे मागील एका महिन्याचे सहा लाख रूपये आणि सातारा भागातील हॉस्पिटलचे साडे चार लाख रूपये जमा होते.

सदर एकुण १० लाख ५० हजार रूपयांची रक्कम एका बॅगेत ठेवून, सखाराम शिंदे हे स्कुटीवरून त्यांच्या घराकडे निघाले. सखाराम शिंदे हे चाटे शाळेजवळ त्यांच्या घराकडे आले असता, या ठिकाणी घरासमोरील लोखंडी गेट उघडून ते घरात प्रवेश करत असता, २५ ते ३० वयोगटातील दोन युवक हे तोंडाला रूमाल बांधुन त्यांच्यावजळ आले. त्यांनी सखाराम शिंदे यांच्या हातातून साडे दहा लाख रुपयांची बॅग हिसकावून पळून गेले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!