मुंबई : सध्या सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहेत. त्यातच आता चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. चांदीच्या दरात तब्बल १२% ची घसरण होऊन तो लोअर सर्किटवर पोहोचला. चांदीच्या दरात अचानक २९००० रुपायांपेक्षा जास्त घट झाली आहे. या ताज्या घसरणीमुळे चांदीचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावरून २ लाखांपेक्षा जास्त खाली आला आहे.
दुसरीकडे, सोन्याच्या दरातही लक्षणीय घसरण झाली असून, MCX वर तो ६% ने घसरला आहे, ज्यामुळे त्याच्या दरात ९००० पेक्षा जास्त घट झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक दर गोठवल्यामुळे आणि सुरू असलेल्या युद्धामुळे झालेल्या मोठ्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
चांदी उच्चांकापेक्षा २ लाखांपेक्षा जास्त स्वस्त
गुरुवारी, आठवड्याच्या चौथ्या व्यापार दिवशी, चांदीचे वायदे बुधवारच्या २४८१९४ च्या बंद भावापेक्षा कमी भावाने उघडले. चांदीचा भाव १२% ने घसरून २१८४११ प्रति किलो झाला होता. परिणामी, १ किलो चांदीच्या भावात २९७०० ची घट झाली.


