Today गुरूवार, 13th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Byelection : सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस कोणता चेहरा रिंगणात उतरवणार? ‘हे’ नाव आघाडीवर

Baramati Byelection : सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस कोणता चेहरा रिंगणात उतरवणार? ‘हे’ नाव आघाडीवर

Baramati Byelection : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आतापर्यंत १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता थेट लढत होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली तरी काँग्रेस मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुगंले, रोहित बनकर आणि डॉ. विजयकुमार पिसे या नावांची चर्चा सुरू होती. यापैकी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे.

आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून उमेदवाराचे अधिकृत नाव जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी विविध पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण १९ उमेदवारांनी अर्ज भरले असून, त्यामुळे बारामतीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!