Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati by-election : बारामती पोटनिवडणुकीवरून ‘मविआ’त मतभेद? काँग्रेस-शिवसेना वेगवेगळ्या भूमिकेत

Baramati by-election : बारामती पोटनिवडणुकीवरून ‘मविआ’त मतभेद? काँग्रेस-शिवसेना वेगवेगळ्या भूमिकेत

Baramati by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतभेद उघड होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडून उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) मात्र सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ‘मविआ’मध्ये बेबनाव वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका यापूर्वीच मांडली होती आणि त्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचेही काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भावनिक आवाहन करत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणाचा उल्लेख करत सर्व पक्षांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही हीच भूमिका घेत काँग्रेसने निवडणूक लढवू नये, असे मत व्यक्त केले. तसेच राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना तशी सूचना द्यावी, असेही त्यांनी म्हटले.

एकूणच, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत होणार, याबाबत अनिश्चितता कायम असून ‘मविआ’मधील अंतर्गत मतभेदही आता समोर येऊ लागले आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!