Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दहिवडी कृषी बाजार समिती सभापती निवडीत हाय व्होल्टेज ड्रामा; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

दहिवडी कृषी बाजार समिती सभापती निवडीत हाय व्होल्टेज ड्रामा; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

दहिवडी: माण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ‘हाय व्होल्टेज’ निवडणूक ड्रामा पाहायला मिळाला. सभापती निवडीसाठी बोलविण्यात आलेली सभा गणपूर्ती न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली, तर उपस्थित राष्ट्रवादी समर्थक संचालकांनी प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेतला. यावेळी भाजप समर्थक सर्व संचालक अनुपस्थित राहिले. बाजार समितीच्या सभापती पदासाठी शेवटची निवडणूक २०२१ मध्ये झाली होती. २० ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थक विलासराव देशमुख हे १० विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या पदाच्या राजीनाम्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी उर्वरीत कालावधीसाठी नव्या सभापती निवडीसाठी तारीख जाहीर केली.

दरम्यान, सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता दहिवडी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. भाजप समर्थक संचालकांना आपला सभापती होणार असा विश्वास होता, पण राष्ट्रवादी समर्थकांनी अचानक आपल्या पॅनेलचे नऊ संचालक वेळेत उपस्थित करून खेळ उलटवला. बाळकृष्ण काळे, कुंडलिक भोसले, सुर्याजीराव जगदाळे, योगेश भोसले, रामचंद्र कदम, किसन सावंत, रामचंद्र झिमल यांनी पंजाबराव पोळ आणि रमेश यादव यांनाही साथ दिली. परिणामी दोन्ही पॅनेलच्या उपस्थित संचालकांची संख्या नऊ, नऊ झाली, ज्यामुळे भाजप समर्थक पॅनेलवर मोठा दबाव पडला.

हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; शिक्षण, उद्योग आणि न्यायव्यवस्थेच्या विकासासाठी मोठे निर्णय

सभापती निवडीसाठी आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्यामुळे अध्यासी अधिकारी धनाजी काळे यांनी सभा तहकूब केली. उपस्थित संचालकांनी जवळपास चार तास नियमांचा काथ्याकूट केला, पण अधिकारी ठाम राहिले आणि जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती दिली. भाजप समर्थक पॅनेलने शिताफीने सभा टाळली. पुढील सभेपर्यंत भाजप समर्थक पॅनेल एक संचालक आपल्या बाजूने आणण्याचे प्रयत्न करणार आहेत, ज्यामुळे पुढील निवडणुकीत समीकरण बदलू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!