Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; शिक्षण, उद्योग आणि न्यायव्यवस्थेच्या विकासासाठी मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; शिक्षण, उद्योग आणि न्यायव्यवस्थेच्या विकासासाठी मोठे निर्णय

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण, उद्योग आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळणार असून, शिक्षणात समान संधी, उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि न्यायव्यवस्थेतील कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या प्रस्तावानुसार, या निधीचा वापर सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील नऊ शैक्षणिक संस्था आणि दोन वसतिगृहांच्या जिर्णोद्धारासाठी केला जाणार आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये या कामांसाठी टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाईल. या निर्णयामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांना नवी दिशा मिळेल तसेच वंचित समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ होईल. उद्योग क्षेत्रात राज्य सरकारने “महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५” जाहीर केले आहे. या धोरणामुळे सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, पाच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. राज्यभरात १५ विशेष बांबू क्लस्टर्स उभारले जातील. शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हेही वाचा – वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल

दरम्यान, विधी आणि न्याय विभागाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यालयासह नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांमध्ये २,२२८ नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेतील प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याला वेग येईल आणि न्यायप्रक्रियेला गती मिळेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!