IAS Officers Transfer : महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय बदल करत एकाच दिवशी तब्बल २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत अनेक जिल्ह्यांच्या कारभारात मोठे फेरबदल झाले आहेत.
राज्य सरकारने जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त अशा महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची अदलाबदल केली आहे. आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. केंद्राच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांना लवकरच जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे.
महत्त्वाच्या बदल्या अशा
कुमार आशीर्वाद – सोलापूरवरून नागपूर जिल्हाधिकारी
एस. कार्तिकेयन – कोल्हापूर ZP वरून सोलापूर जिल्हाधिकारी
विनय गौडा – चंद्रपूरवरून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी
वसुमना पंत – चंद्रपूर जिल्हाधिकारी
प्रवीण देवरे – पुण्यावरून बुलढाणा जिल्हाधिकारी
किरण पाटील – बुलढाण्यावरून पशुसंवर्धन आयुक्त, पुणे
भारत बास्टेवाड – लातूर जिल्हाधिकारी
डॉ. विजय राठोड – कोल्हापूर जिल्हाधिकारी
डॉ. मंगेश गोंदवले – गोंदिया जिल्हाधिकारी
अमोल येडगे – संभाजीनगर महापालिका आयुक्त
डॉ. राजेंद्र भारूड – कोल्हापूर महापालिका आयुक्त
वर्षा लड्डा – अमरावती महापालिका आयुक्त
संगीता मोहपात्रा – सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त
याशिवाय इतरही अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मोठ्या फेरबदलामुळे प्रशासनात नवे समीकरण तयार होणार असून आगामी काळात त्याचा परिणाम कामकाजावर दिसून येणार आहे.


