Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महसूल सुनावण्या डिजिटल होणार; महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल ! ‘प्रत्यय’ ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सुरु

महसूल सुनावण्या डिजिटल होणार; महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल ! ‘प्रत्यय’ ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सुरु

मुंबई: राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने ‘प्रत्यय’ ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू करून महसूल विभागाने महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीचा शुभारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘प्रत्यय’ प्रणाली ही शासकीय कामांची सुंदर अनुभूती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्राला पारदर्शी आणि गतिमान शासन देण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महसूल खात्याने १०० दिवसांत ‘प्रत्यय’ प्रणाली विकसित करण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे. या प्रणालीमुळे राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होतील, परिणामी नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. राज्यात सध्या महसूल खात्यात अकरा हजार प्रलंबित प्रकरणे आहेत. या प्रकरणांचे त्वरित आणि न्याय्य निवारण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने निर्णय प्रक्रीया जलद आणि सुटसुटीत करण्याचा विचार शासन करत आहे. आगामी काळात महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. सरकारची नाममात्र फी भरुन सर्व निर्णय डाऊनलोड करता येणार आहेत.

नागरिकांची गैरसोय दूर

सध्या राज्यामध्ये महसूल विभागात साधारणपणे दीड लाख अर्ध न्यायिक तर भूमि अभिलेख विभागात सुमारे १५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. वैचारिक मतभेद यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात परिणामी अपिलाची प्रकरणे निर्माण होतात. प्रत्ययमुळे नागरिकांची पायपीट वाचणार असून वेळ, पैशाची बचत होणार आहे.

राज्यातील महसूल विभागाला देशातील पहिल्या क्रमांकावर नेण्याचा मानस आहे. इतर राज्यांसाठी महाराष्ट्राचे महसूल खाते एक आदर्श ठरेल. आगामी काळात व्हिडिओद्वारे महसुली सुनावणी घेण्यासाठी प्रयत्न आहे. संपूर्ण कार्यप्रणाली पेपरलेस होईल यासाठी काम सुरू असून महसूल विभागाचे डेटा सेंटर सुरू करण्याचा मानस आहे.

-चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

काय आहे ‘प्रत्यय ‘ प्रणाली

  1. ‘प्रत्यय’ प्रणालीमुळे नागरिकांना फेरफार,तक्रारी,अपील,पुनर्विलोकन अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे.
  2. अर्जाची सद्यस्थिती, सुनावणीचा दिनांक वेळ, विरुद्ध पक्षाचे म्हणणे सर्व काही ऑनलाईन पाहता येणार आहे.
  3. दिवाणी न्यायालयाप्रमाणे ऑनलाईन सुनावणीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
  4. घरबसल्या अपिलदार, जबादार आणि वकील आपले म्हणणे मांडून वेळ, श्रम आणि पैसा वाचवू शकतील.
  5. ‘प्रत्यय’ प्रणालीचे पहिल्या टप्प्यात जिल्हा अधीक्षक ते टीएलआर स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि अन्य महसूल अधिकाऱ्यांसाठी कार्यान्वित होणार आहे.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!