पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सुरक्षा रक्षक मंडळ महाराष्ट्र येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र येथे सुरक्षा रक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 317 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८-०५-२०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सुरक्षा रक्षक.
– एकूण रिक्त पदे : 317 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता.
– शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२वी) उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : किमान वय १८ वर्ष व कमाल वय ३५ वर्ष.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी: रु. १००/- व टॅक्स आणि राखीव वर्गासाठी: रु. ७५/- व टॅक्स.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८.०५.२०२६, सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sgbregistration.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


