Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मोठी बातमी! नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नाशिक : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे निघालेल्या कर्मभूमी एक्सप्रेस (ट्रेन क्र. १२५४६) मधून तीन युवक खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (ता. १८ ऑक्टोबर) रात्री नाशिक रोड परिसरात घडली आहे. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर, पवारवाडी येथील साईनाथनगर परिसरातील मारुती मंदिराजवळ रात्री ८:१८ नंतर घडली. रेल्वे न थांबता पुढे निघाल्यानंतर ओढा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन प्रबंधकांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला हनुमान मंदिराजवळील ढिकलेनगर परिसरात तीन युवक रेल्वेतून खाली पडल्याची माहिती दिली.

नाशिक रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार भोळे यांनी भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील किलोमीटर १९०/१ ते १९०/३ दरम्यान दोन युवक मृत आणि एक गंभीर जखमी अवस्थेत आढळले. जखमीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत आणि जखमी युवकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दिवाळी सणामुळे रेल्वेत प्रचंड गर्दी होती. प्राथमिक तपासात, दरवाजाजवळ उभे असलेले हे युवक गर्दीमुळे तोल जाऊन खाली पडले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी, याचा तपास सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!