पुणे: कालव्याशेजारी पार्टी करताना झालेल्या वादातून दोघांनी मित्राला वाहत्या पाण्यात ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास करून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विनोद शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वैभव जाधव (वय ४२, छत्रपती संभाजीनगर) व त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विनोद, वैभव आणि आशिष गेल्या वर्षी ४ मे २०२४ ला हडपसर भागातील उन्नतीनगर परिसरातील कालव्याजवळ पार्टी करण्यासाठी गेले होते. तिघांनी तेथे दारू प्यायली. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वैभव आणि आशिष त्यांनी विनोदला वाहत्या पाण्यात टाकून दिले. पाण्यात बुडून विनोदचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला हडपसर पोलिसांनी अकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. यासंदर्भात आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप विनोद यांच्या पत्नीने केला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोघांची चौकशी केली.


