Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Akola Crime: नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून कारनामा

Akola Crime: नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून कारनामा

Akola Crime: अकोल्यातील कौलखेड भागात अकोला पोलिसांच्या भीतीच्या दहशतीची लक्तरं वेशीवर टांगण्यात आली आहेत. शहरातील कौलखेड भागातील श्रद्धानगर 3 मध्ये नशेखोर टोळीने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. या टोळ्यक्याने तीन जणांना चाकू मारत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. धुरंदर टू चित्रपट बघून आल्यानंतर नशेखोर युवकांची परिसरात चाकू आणि पाईपच्या बळावर दहशत केल्याची ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, आजच धुरंधर सिनेमा पाहिल्यानंतर नांदेडमध्ये मध्यरात्री हत्याकांडाची घटना घडली होती, त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा नगर-3 येथे अभिलाष अरविंद हिंगे (वय 32) यांच्यावर चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. तसेच, कौलखेड चौकात रवि उर्फ छोटू ठाकरे (वय 24) याच्यावरही त्याच टोळीने हल्ला करुन जखमी केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस आणि एलसीबीचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर कौलखेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. अकोल्यातील खदान पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील कौलखेड आणि इतर भागात देखील नशेखोर तरुणांची दहशत पाहायला मिळते, या दहशतीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण
शाळेतील वर्गपाठाची वही न आणल्याच्या क्षुल्लक कारणावरून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव शहरातील श्री श्री रविशंकर या खासगी शाळेतील हा प्रकार असून विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरोधात धाराशिव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याने क्लासवर्कची वही आणली नाही म्हणून आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, पाठीवर मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली असून शिक्षकाविरोधात बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!