Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना

बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना

कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे एका तरुण दंतचिकित्सकाने राजाराम तलावात उडी घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवधूत मुळे असे या दंतचिकित्सकाचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी पाठीवरच्या बॅगेत दगड आणि विटा भरले होते. याशिवाय मित्रांना आणि नातेवाईकांना शेवटचा संदेश पाठवला होता. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक नैराश्यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

घटनेच्या दिवशी अवधूत दुचाकीने राजाराम तलाव गाठले. तलाव काठावर दुचाकी उभी करून त्यांनी सुसाईड नोट लिहिली आणि नंतर तलावात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक समस्या कारणीभूत असल्याचे समोर आले आहे, मात्र सुसाईड नोटमधील तपशील अद्याप उघड झालेला नाही.

या घटनेने मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्रात अलीकडे आत्महत्यांच्या घटना वाढल्या असून, मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्या यामुळे असे प्रकार घडत असल्याचे दिसते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!