Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अहिल्यानगर हादरले! संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर हादरले! संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Leopard Attack : महाराष्ट्रात मानव-बिबट्या संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. जवळे कडलग गावातील चिखली रस्त्यालगत असलेल्या एका वस्तीवर शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने ४ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संतप्त ग्रामस्थांनी नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे. मृत चिमुकल्याचे नाव सिद्धेश सूरज कडलग असे आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेशचे वडील सूरज कडलग गोठ्यात जनावरांना चारा टाकत होते, तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात जात होती. याचवेळी सिद्धेश घराच्या दारात उभा होता. अंधाराचा फायदा घेऊन गिन्नी गवतात दडून बसलेल्या बिबट्याने अचानक सिद्धेशवर झडप घातली. बिबट्याच्या क्रूर हल्ल्यात सिद्धेशने जोरात किंचाळले, मात्र तो जागीच कोसळला.

सिद्धेशच्या आवाजाने वडील आणि आजी धावत आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ग्रामस्थांनी एकच आक्रोश केला. जोपर्यंत बिबट्याला जेरबंद किंवा ठार केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात बिबट्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून, अहिल्यानगर, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांत अशा घटना घडल्या आहेत. राज्य सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली असली तरी ग्रामस्थांच्या रोषाला आवर घालणे अवघड झाले आहे. वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली असून, लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!