Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लॅपटॉप घ्यायचाय? पण बजेट कमी आहे, तर चिंता नको…! 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील ‘हे’ पर्याय एकदा पाहाच

लॅपटॉप घ्यायचाय? पण बजेट कमी आहे, तर चिंता नको…! 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील ‘हे’ पर्याय एकदा पाहाच

नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनसह लॅपटॉपचाही वापर वाढताना दिसत आहे. त्यात ऑफिसमधील जवळपास सर्वच कामे लॅपटॉपवर होत असल्याने लॅपटॉप विकत घेणारेही अनेकजण आहेत. मात्र, त्याच्या वाढत्या किमतीमुळे काहींना घेणे अडचणीचे ठरते. पण, असे काही लॅपटॉप आहेत ते तुमच्या अगदी बजेटमध्ये असू शकतात.

नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात पण कमी बजेटमध्ये? तुम्ही क्रोमबुकचा विचार करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला विविध ब्रँडचे क्रोमबुक अतिशय कमी किमतीत मिळतील. तुम्ही ते १२००० पासून सुरू होणाऱ्या किमतीत देखील खरेदी करू शकता. क्रोमबुक हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय आहेत. ते वेब सर्फिंग, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आणि किरकोळ एडिटिंगसाठी वापरले जाऊ शकतात. हा लॅपटॉप गुगलच्या क्रोम ओएसवर आधारित आहेत आणि अँड्रॉइडसारखा अनुभव मिळू शकेल.

तुम्ही अमेझॉनवरून १२९९० मध्ये JioBook ११ खरेदी करू शकता. हे डिव्हाइस JioOS वर चालतो. यात ४GB RAM आणि ६४GB eMMC स्टोरेज मिळत आहे. हा लॅपटॉप ११.६-इंच डिस्प्लेसह येतो आणि वायफाय आणि सिम दोन्ही पर्याय यामध्ये मिळत आहेत. याशिवाय, लेनोवो क्रोमबुक देखील खरेदी करू शकता, जे इंटेल सेलेरॉन N४५०० प्रोसेसरसह येतो. त्याची किंमत १४९९० रुपये आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. यात ११.६ इंचाचा डिस्प्ले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!